महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढली असून पुढील २४ ते ४८तासांत पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत एक ते दोन जोरदार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुण्यातील (जुलै मधील) मासिक सरासरी पाऊस १८७. २ मिमी असून आता पर्यंत १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आता, शहरामध्ये परत चांगल्या पावसाची शक्यता आहे, अशी आशा आहे पाऊस मासिक सरासरीपेक्षा जास्त होईल.
स्कायमेटकडे उपलब्ध आकडेवारीनुसार,गेल्या २४ तासांत शनिवार सकाळी ८:३० पासून मालेगावमध्ये ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, त्यानंतर अमरावतीमध्ये ४७ मिमी, बुलढाणामध्ये ४५ मि.मी., माथेरानमध्ये ३५ मिमी, जळगावमध्ये ३३ मिमी आणि यवतमाळमध्ये ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत पुण्यामध्ये ४. ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाचे कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत सक्रिय असलेल्या दोन हवामान प्रणाली होत. ही प्रणाली महाराष्ट्रातून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागातून सरकणार असल्याने या भागांत पाऊस होणार आहे. या शिवाय, महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषा अधिक प्रभावी होत आहे.
पुढे, २३ जुलै आणि २४ जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण भागातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडू शकतो. या दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये मान्सून अधिक सक्रिय होईल आणि उत्तर दिशेकडे सरकेल.
अशा प्रकारे पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सांगली येथे गडगडाटासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ जुलै रोजी पावसाच्या तीव्रतेत वाढ होईल. या भागात प्रतिदिन ३० ते ४० मि.मी. पावसाची नोंद होऊ शकते. शिवाय, विजेच्या गडगडाटासह एक ते दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. या पावसाळी गतिविधींसोबत गडगडाटासह जोराचा वारा वाहण्याची शक्यता आहे. म्हणून घाटांत प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
प्रतिमा क्रेडीट: टाइम्स ऑफ इंडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे