Skymet weather

[Marathi] पुण्यात चोवीस तासांत ५ मिमी पाऊस, पुढील काही दिवस हलका पाऊस सुरू राहील

September 20, 2019 11:14 AM |

Pune weather

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपासून पुण्यात २४ तासांच्या कालावधीत ५ मिमी पाऊस झाला. तथापि, शहराच्या आसपासच्या भागांत एक-दोन तीव्र सरींसह मध्यम पाऊस पडला.

स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रातील हवामान प्रणाली पुढे निघून गेली आहे, म्हणून पुढील तीन ते चार दिवस शहरावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. पाऊस फक्त हलका राहील आणि केवळ काही ठिकाणीच अनुभवण्यात येईल.

२४ किंवा २५ सप्टेंबरच्या सुमारास पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढेल आणि शहरात एक किंवा दोन मध्यम सरी बरसतील. मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे.

हवामान सोयीस्कर राहील. कमाल तापमान २७ डिग्री सेल्सियस आणि किमान २१ डिग्री सेल्सिअसपर्येंत राहील.

जुलै महिन्यात पुण्यात सर्वात जास्त पाऊस पडतो व ऑगस्ट आणि सप्टेंबर येत्या पावसाचा जोर कमी होतो. शहरात सप्टेंबर महिन्याच्या मासिक सरासरीच्या १२०.१ मिलिमीटरच्या तुलने आत्तापार्येंत केवळ ८८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सद्याची परिस्थिती पाहता, शहर मासिक सरासरी ओलांडू शकेल, असे नाही दिसून येत आहे.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try