[Marathi] महाराष्ट्र हवामान अंदाज (१० जून ते १६ जून ), शेतकऱ्यांना सल्ला

June 9, 2019 4:44 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात, दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पावसामुळे तापमानात किंचित घट देखील दिसून आलेली आहे. तथापि, विदर्भातील काही भाग जसे चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी आता पर्यंत उष्णतेच्या लाटांशी लडत आहे.

एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व अरब सागर आणि त्याच्या आसपास बनलेला आहे. येणाऱ्या दिवसात ही हवामान प्रणाली अजून तीव्र होऊन उत्तर/उत्तर पश्चिम दिशेत पुढे जाईल ज्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कोंकणयातील किनारी भागात

येणाऱ्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये ११ व १२ जून रोजी हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

याउलट, विदर्भाच्या उत्तर भागात जसे वर्धा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी येथे येणाऱ्या दिवसात मुख्यतः हवामान गरम आणि उष्ण राहील. तथापि विभागातील दक्षिण भागात जसे नांदेड, यवतमाळ आणि नागपूर, येथे एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे, ज्यामुळे फळांच्या बागांना पाणी नियमित द्यावे लागेल. काही भागात धूळ चालण्याची शक्यता आहे ज्यामुळे रोप व झाड्याना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करावे. कापूस, उडद आणि शेंगदाणे पेरण्यासाठी शेत तैयार करावे. रेज्ड बेड विधीने रोप वाटिका तैयार कराव्या व शेतातील माती व आद्रता सुरक्षित ठेवण्यासाठी देखील प्रबंध करावे.

साधारपणे, महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन १० जून रोजी होतात, परंतु, या वर्षी आठवड्याच्या विलंबानंतर दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे केरळात ८ जून रोजी आगमन झाले आहे. प्रभावाने, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून जरा उशिराच पोहोचणे अपेक्षित आहे. तथापि, बनलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात किंचित वाढणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES