Skymet weather

[Marathi] पुढील २४ तासात नागपूर, अकोला आणि चंद्रपूर येथे पाऊस, उकडयापासून सुटकेची आशा

May 10, 2019 7:25 PM |

मागील बऱ्याच दिवसांपासून विदर्भ उष्णतेच्या लाटे मध्ये होरपळत आहे. या विभागात तापमान ४४ ते ४६ अंशा दरम्यान नोंदविले जात आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पारा ४४ अंशाच्या आसपास स्थिरावलेला आहे जे सामान्यपेक्षा अधिक आहे. त्याउलट कोकण आणि गोव्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे, तर मुंबई, डहाणु, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी भागात तापमान ३० अंशाच्या आसपास आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत, महाराष्ट्रातील काही भाग, विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळेल. सध्या एक ट्रफ रेषा झारखंडपासून कर्नाटकापर्यंत विस्तारलेली असून, विदर्भ आणि मराठवाड्यातून प्रवास करत आहे. तसेच विदर्भावर एक संगम क्षेत्र देखील विकसित झाले आहे. या हवामान प्रणालीव्यतिरिक्त, अरबी समुद्रावरील आर्द्र वारे उत्तरपश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांचा मेळ होत आहे. यांचा संयुक्त प्रभाव म्हणून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यावर पाऊस होईल.

आज उशिरा दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटी परिस्थिती उद्भवण्याची अपेक्षा करतो. उद्या ११ मे रोजी विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, मराठावाड्यातील एक-दोन ठिकाणी प्रामुख्याने नांदेड, हिंगोली आणि जालना येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस अनुभवता येईल.

याशिवाय, आगामी हवामानाच्या गतिविधिंमुळे, कमाल तापमान २ ते ३ अंशांनी कमी होईल आणि पारा ४० अंशाच्या आसपास राहील. तापमानात घट झाल्यामुळे या प्रदेशांमधून उष्णतेची लाट कमी होण्यास मदत होईल.

Image Credit:en.wikipedia.org

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try