[Marathi] मुंबईचा पाऊस: जून मधील सर्वाधिक पावसाची नोंद, १००० मिमी ची पातळी पार केली

June 23, 2015 5:21 PM | Skymet Weather Team

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान संस्थेने वर्तविल्यानुसार जून महिन्याचे अजून सात दिवस जायचे आहेत आणि तरीही मुंबईच्या पावसाने १००० मिमी हि पातळी आताच पार केली आहे. याआधीच्या सर्वोच्च (१९७१ मध्ये जून महिन्यात १०३७.१ मिमी) नोंदीचे आकडे पार करत मुंबईत १०४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

थोड्याश्या विश्रांतीनंतर मान्सूनचा पाऊस पुन्हा जोमाने सुरु झाला. सोमवारी दिवसभर जरी तुरळक पाऊस होत असला तरी मंगळवारी सकाळी मुंबईत जोरदार पाऊस झाला.

सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात ८९ मिमी पावसाची नोंद झाली असून यातील बहुतांश पाऊस मंगळवारी पाहते ५.३० ते सकाळी ८.३० पर्यंत झाला आहे.

स्कायमेट या संस्थेने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार आज दिवसभर मुंबईत मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता अजूनही वाढू शकते कारण अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या किनारपट्टीजवळ सरकले आहे.

गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसाची नोंद ७८९ मिमी झाली असून या नोंदीचा रेकॉर्ड ब्रेक साठी मोठाच वाट आहे. याबरोबरच जून महिन्यात गेल्या दहा वर्षात फक्त २४ तासात झालेल्या जास्तीत जास्त पावसाची नोंदही या वर्षीच झाली आहे. २० जून २०१५ ला २८३ मिमी पावसाची नोंद झाली तसेच याआधी २४ जून २००७ ला २०९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

 

 

तसेच २१ जून लाच मुंबई शहरातील पावसाने मासिक सरासरीही (५२३ मिमी) पार केली होती.

OTHER LATEST STORIES