[Marathi] महाराष्ट्रातील काही भागात पाऊस, गर्मी पासून दिलासा

October 18, 2018 6:17 PM | Skymet Weather Team

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाची तुट राहिलेली असून, कोरडी परिस्थिती अनुभवण्यात येत आहे. मध्य-महाराष्ट्रात ७५%, मराठवाड्यात ८५%, विदर्भात ९९% तर कोकण आणि गोव्यात ६९% कमी पाऊस नोंदवण्यात आलेला आहे.

दरम्यान, वरुणराजाने आपली कृपादृष्टी राज्यावर दाखवलेली असून मागील २४ तासात महाराष्ट्रातील काही भागात विशेषतः कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून फक्त दक्षिण कोकण आणि गोव्यात पाऊस अनुभवण्यात येत होता परंतु आता उत्तर कोकण- गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पुण्यात देखील प्रदीर्घ कोरड्या वातावरणानंतर पावसाची नोंद करण्यात आलेली असून, मागील २४ तासात दक्षिण मुंबई शहर व उपनगरात देखील मेघगर्जनेसह पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. या पावसामुळे कोकण-गोवा आणि उत्तर मध्य-महाराष्ट्रातील तापमान देखील २-३ अंशांनी कमी झाले आहे.

दरम्यान ,उत्तर कोकण आणि गोव्यावर एक कमकुवत कमी दाबाचा पट्टा विकसित झालेला आहे, ज्यामुळे मध्य-महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यातील बऱ्याच भागांवर पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मुंबई शहर आणि उपनगरात देखील हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार,२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी नाशिक, मालेगाव, अहमदनगर आणि उत्तरेकडील जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु कमी दाबाचा पट्टा कमकुवत राहणार असल्यामुळे पावसाचा जोर कमी राहिल ज्यामुळे राज्यातील नागरिकांना सध्या सुरु असलेल्या गर्मी पासून पूर्ण रूपाने सुटकारा मिळण्याची अपेक्षा नाही.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES