मुंबई शहरात आज सकाळी आकाशात ढगाळ दिसले आणि सकाळी ७:३० पर्यंत सूर्याने उगवायला नकार दिला होता. काल सकाळी देखील मुंबईच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली होती.
तथापि, दुपारी सूर्य उगवला होता. आज असे दिसून येत आहे की ढगाळ आकाशाची स्थिती दुपारच्या वेळेतही कायम राहिल व दक्षिणेकडील वारे वाहू लागतील.
मुंबईच्या पावसा बदल सांगायचे, तर आज एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, उद्या पण एक दोन ठिकणी पाऊस पडू शकतो असे दिसून येत आहे. त्यानंतर, मुंबईचे हवामान थोड्या काळासाठी कोरडे होईल. होणाऱ्या पावसाचे कारण आहे एक ट्रफ रेषा जी सध्या महाराष्ट्राच्या किनारी भागांवर बनलेली आहे.
मुंबई मध्ये आज ढगाळ आकाशासह कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर नोंदवला जाईल. समुद्राकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे संध्याकाळ मात्र आनंदायी होईल.
साधारणपणे, पूर्व मॉन्सूनच्या पावसाचा जोर जूनचा पहिल्या आठवड्या पर्यंत मुंबई शहरात वाढतो, परंतु या वर्षी, आता पर्यंत मुंबईत चांगल्या पावसाची नोंद नाही करण्यात आलेली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे कि येणाऱ्या दिवसात सुद्धा कोणतीही महत्वपूर्ण गतिविधींची नोंद नाही करण्यात येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे