मुंबई आणि आसपासच्या भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे ज्यामुळे रहिवाशांना कोरड्या हवामानापासून सुटका मिळाला आहे. खरं तर, ह्या हंगामात मुंबई आणि आसपासच्या भागात झालेला हा पहिलाच पाऊस आहे. पावसाचे कारण आहे एक ट्रफ रेषा जी सध्या महाराष्ट्राच्या किनारी भागांवर बनलेली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे कि येणाऱ्या ४८ तासात मुंबई आणि आसपासच्या भागात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद करण्यात येईल. त्यानंतर, हवामान पुन्हा एकदा पूर्ण पणे कोरडे होईल.
या वर्षी, मॉन्सूनच्या आगमनाला फार काळ प्रतीक्षा करावी लागेल. केरळ मध्ये मान्सून ७ जून पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मुंबईच्या रहिवाशांना सुद्धा चांगल्या पूर्व मॉन्सूनच्या पावसा करता आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
साधारणपणे,मे महिन्यात, मुंबईत पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचे आगमन होते, परंतु या वर्षी परिस्थितीत बदल दिसून आलेला आहे. कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणालीच्या अनुपस्थित मुंबईतील हवामान मुख्यतः कोरडेच राहिलेले आहे. मुंबईत पाऊस पडण्यासाठी मुख्यतः कारण आहे, ट्रफ किंवा चक्रवाती परिस्थितीची उत्तर पूर्व अरब सागर व लगतच्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांवर उपस्थिती. परंतु, ह्या हंगामात दोन्ही महत्वपूर्ण हवामान प्रणाली मुंबई किंवा आसपासच्या भागात नाही विकसित झालेली आहे. संपूर्ण पूर्व मॉन्सूनच्या हंगामात मुंबईतील हवामान मात्र कोरडेच राहिलेले आहे.
आमची अशी अपेक्षा आहे कि होणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना गरमी पासून काही काळ सुटका मिळेल. तथापि, जोरदार पावसाच्या अनुपस्थित तापमानात फार काही लक्षणीय घट नाही दिसून येईल. पावसाचा जोर दक्षिण पश्चिम मॉन्सूनच्या आगमनानंतरच वाढणे अपेक्षित आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे