मान्सूनची परिस्थिती बदलून आता मराठवाड्यात सामान्य झाली असून पावसाळी गतिविधींमध्ये देखील वाढ झाली आहे. वास्तविक, बीड आणि परभणी येथे बर्याच कालावधीनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. याउलट,विदर्भातगेल्या २४ तासात पावसाने दडी मारल्यामुळे केवळ हलका पाऊस पडला.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून माथेरान आणि ठाण्यात प्रत्येकी ५६ मिमी, अहमदनगर ३४ मिमी, महाबळेश्वर २८ मिमी आणि गोंदियामध्ये ६ मिमी पावसाची नोंद झाली.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मध्यम सरी बरसतील. दुसरीकडेमुंबईसह उत्तर कोकण आणि गोवायेथे विखुरलेल्या हलक्या सरींसह हवामान कोरडे राहील.
२४ ऑगस्टच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे होऊ लागेल. तथापि, विदर्भात नागपूर, अमरावती, गोंदियात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान २५ ऑगस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा कमकुवत होईल आणि २८ ऑगस्टपर्यंत पावसाळी गतिविधींचा अभाव राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस अपेक्षित आहे.
Image Credits – The Hindu Business Line
Any information taken from here should be credited to Skymet Weather