[Marathi] दोन प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरच्या आसपास पाऊस, तोवर हलक्या सरी सुरूच राहणार

October 14, 2019 2:56 PM|

Maharashtra weather

पावसाला कारणीभूत ठरणारी हवामान प्रणाली आता दूर गेली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील हवामान विषयक गतिविधी कमी झाल्या आहे. पुढील तीन दिवसांत, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यात तुरळक मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आमच्या हवामानतज्ञांच्या अनुसार,येत्या ७२ तासांत राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.तथापि, १७ ऑक्टोबरच्या सुमारास पावसाळी गतिविधी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, प्रामुख्याने दोन हवामान प्रणालींचा संयुक्त प्रभाव पावसाळी गतिविधिंमध्ये वाढ होण्यास कारणीभूत असेल.

एक कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश ते विदर्भातून मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारण्याची अपेक्षा आहे आणि हवामानाच्या वरच्या थरात विभिन्न वाऱ्यांचा संगम तयार होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम सरींची शक्यता आहे. दरम्यान याकाळात दक्षिण कोकण आणि गोवा येथेही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या १९ आणि २० ऑक्टोबरलामुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, तर १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान पुणे येथे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असून १ ते १३ ऑक्टोबर या काळात सामान्य पावसाच्या तुलनेत ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मराठवाडा, कोकण आणि गोवा विभाग देखील फक्त ४ टक्क्यांच्या (+/- १९ सामान्य मानले जातात) कमतरतेसह पाऊस सामान्य राहिला आहे. पावसाच्या बाबतीत विदर्भ विभाग हा एकमेव अपवाद राहिला आहे जिथे पावसाळ्यानंतरचा हंगाम सुरू झाल्यापासून सामान्य पावसाच्या तुलनेत ७७% कमी पाऊस पडला आहे.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

author image