काल विदर्भाच्या बऱ्याच भागांत मुसळधार ते जोरदार पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्याच्या बऱ्याच भागात मध्यम पाऊस पडला. विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेला हलका पाऊस झाला आहे.
परंतु आता वातावरणात बनलेला डिप्रेशन कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये कमकुवत झाला आहे आणि गेल्या २४ तासांत तो आणखी पश्चिमेकडे सरकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत पाऊस कमी झाला आहे.
मागील दिवसाच्या तुलनेत विशेषत: दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच कोकण आणि गोवा क्षेत्रात पावसाच्या तीव्रतेत लक्षणीय घट झाली आहे. पावसाचा जोर आणखी कमी होत असल्याने पूर यासारखी परिस्थितीतून दिलासा मिळेल.
सद्यस्थितीत सांगली, सातारा, कोहलापूर यासारख्या ठिकाणी तीव्र पूर आला आहे. परंतु आता संपूर्ण राज्यात पाऊस कमी होईल व परिस्थितीत सुधारणा दिसून येईल.
मुंबईतही हलका पाऊस पडला आहे. मुंबई, उत्तर कोकण आणि गोवा येथे पुढील काही दिवस विखुरलेला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस सुरु राहील. मध्य महाराष्ट्र विशेषत: उत्तर मध्य महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती उद्भवू शकते.
Image Credits – The Weather Channel
Any information taken from here should be credited to Skymet Weather