गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट झाली असून गेल्या २४ तासांत गुजरातच्या पूर्वेकडील भाग तसेच आसपासच्या भागात आणि पूर्व विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी तुरळक मध्यम सरीसह हलका पाऊस पडला आहे.
स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत दिसा येथे ७ मिमी, भावनगर ३ मिमी, वलसाड ८ मिमी, वडोदरा २ मिमी, वर्धा ११ मिमी, वाशिम ७ मिमी आणि नागपुरात ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटच्या हवामानतज्ञांनी दोन्ही राज्यांतील पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. कारण कमी दाबाचा पट्टा ईशान्य भारताच्या दिशेने पुढे सरकला असून महाराष्ट्र किंवा गुजरात या दोन्हीपैकी कोठेही कोणतीच महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली अस्तित्वात नाही.
वातावरणातील खालच्या थरात एक चक्रवाती अभिसरण दक्षिण पाकिस्तान आणि लगतच्या राजस्थानवर असून उत्तर-मध्यप्रदेश ते तेलंगाणापर्यंत विदर्भातून एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे.
या प्रणालींमुळे पूर्वेकडील गुजरातमध्ये काही भागातच आर्द्र नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळे काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि पाटण यासारख्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये पावसाळी गतिविधींमध्ये आणखी घट होईल आणि ४८ तासानंतर वायव्येकडून वारे वाहू लागतील ज्यामुळे राज्यात वातावरण आणखी कोरडे होईल.
दरम्यान, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये लक्षणीय पावसाळी गतिविधींची शक्यता नाही. खरं तर, मुख्यतः किनारीभागात आणखी २४ ते ४८ तास हवामान कोरडे राहू शकते. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव आणि नाशिकच्या काही भागात चोवीस तासांच्या कालावधीत तुरळक सरींची शक्यता आहे.
तापमानात वाढ झाल्याने मुंबई व पुणे ह्या शहरातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
Image Credits – Hindustan Times
Any information taken from here should be credited to Skymet Weather