[Marathi] कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरच्या सुमारास पावसाचा जोर वाढणार

October 16, 2019 3:06 PM | Skymet Weather Team

लवकरच दोन मजबूत हवामान प्रणालींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पाऊस १७ ऑक्टोबरपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

कमी दाबाचे क्षेत्र जे सध्या लक्षद्वीपजवळ चक्राकार परिभ्रमण म्हणून उपस्थित आहे. ही प्रणाली पश्चिम / वायव्य दिशेने उत्तर कोकण किनारपट्टीकडे जाईल आणि नंतर चिन्हांकित कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल, ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या ठाणे, डहाणू आणि दक्षिण गुजरातचा भाग प्रभावित होतील.

तर दुसर्‍या प्रणालीत एक कमी दाबाचा पट्टा समाविष्ट आहे जो मध्यप्रदेश पासून विदर्भातून मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारेल ज्यासोबत वातावरणात ५०० मिलीबार पातळीवर वाऱ्यांचा संगम विकसित होण्याची शक्यता आहे.

या दोहोंच्या संयुक्त प्रभावामुळे पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होईल आणि मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाची अपेक्षा आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यातही काही चांगल्या सरींची शक्यता आहे.

मुंबईत १९ ऑक्टोबरला पाऊस परतेल आणि २० व २१ ऑक्टोबरला एक-दोन तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मध्य-महाराष्ट्रासाठी पावसाळ्याच्या नंतरच्या हंगामाची सुरूवात चांगली झाली असून १ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या आकडेवारीनुसार पावसाचे ३१ टक्के आधिक्य राहिले आहे.

मराठवाडा, कोकण आणि गोवा विभाग देखील फक्त ४ टक्क्यांच्या (+/- १९ टक्के सामान्य मानले जातात) कमतरतेसह सामान्य पावसाच्या श्रेणीत आहेत.

तथापि, मान्सूननंतरचा हंगाम सुरू झाल्यापासून विदर्भात पावसाची कमतरता ७७ टक्के आहे.

Image Credits – Business Standard 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES