गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत गडगडाटासह चांगला पाऊस झाला आहे. अकोला, औरंगाबाद, नाशिक, आणि मुंबईसारख्या ठिकाणी गडगडाटी पाऊस पडला. खरं सांगायचं तर, महाराष्ट्राच्या सर्व चार हवामान विभागांसाठी काल चांगला पाऊस पडला असे म्हणणे वावगे होणार नाही.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, विदर्भावर काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होईल, परंतु पुढील काही दिवस एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस सुरु राहील. यामुळे पावसाची असलेली तूट थोड्या प्रमाणात कमी होईल.
मराठवाड्यात, विशेषतः, पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस अनुभवायला मिळेल. तसेच मध्य-महाराष्ट्रासह कोकण आणि गोवा येथे देखील सारखीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर कमी असेल, परंतु शहर आणि उपनगरात काही मध्यम सरींची शक्यता नाकारता येणार नाही.
पुढील ४८ तासांनंतर, संपूर्ण कोकण आणि गोवासह मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा असून मध्यम स्वरूपाच्या पावसासह एक किंवा दोन जोरदार सरींची शक्यता आहे.
अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की पावसाच्या बाबतीत पुढचा आठवडा महाराष्ट्रासाठी चांगला आहे. ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची तूट काही प्रमाणात कमी होईल तर मध्य-महाराष्ट्र आणि कोकण व गोवा येथे अधिशेषात आणखी वाढ होईल.
प्रतिमा क्रेडीट: इंडिया टूड़े
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे