[Marathi] पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पाऊस

June 16, 2019 5:45 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील किनारी भागात मागील बऱ्याच दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तीव्र चक्रीवादळ वायु, जे राज्यापासून दूर जात असले तरी त्याच्या प्रभावामुळे पाऊस पडत आहे.

गेल्या २४ तासांत, महाराष्ट्रात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला आहे.

स्कायमेटच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, नाशिकमध्ये ९२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्याखालोखाल गोंदिया येथे २० मिमी पाऊस, रत्नागिरीत ११.७ मिमी आणि महाबळेश्वर मध्ये ९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या गतिविधींसोबत मध्यम ते जोराचा वारा देखील होता. दुसरीकडे, अंतर्गत भागांमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलके वारे वाहत आहेत.

गेल्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामानाची परिस्थिती गरम असून काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती अनुभवण्यात येत आहे.

स्कायमेटनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चालू असलेल्या पावसाचे कारण पूर्वोत्तर अरबी समुद्रावर असेलेले तीव्र चक्रीवादळ वायू आहे. शिवाय, दक्षिण किनाऱ्यापासून केरळपर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे. ज्यामुळे, पुढील २४ ते ३६ तासांत किनारीभागात जोरदार वारा व गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, या पावसाचा जोर वाढेल.

याउलट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान जवळपास कोरडे राहील. तथापि, पुढील ३६ ते ४८ तासांच्या दरम्यान, काही ठिकाणी गडगडाटासह हलका पावसाची शक्यता नाकारली जाऊ शकत नाहीत.

शिवाय, हवामान ढगाळ झाल्यामुळे दिवसाचे तापमान किंचित कमी होईल, तथापि, चंद्रपूरसारख्या ठिकाणी आणखी काही काळ उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती राहू शकते.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हर्णे, मुंबई, कुलाबा, डहाणू, सांताक्रूज, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, गोंदिया आणि नागपूरसारख्या ठिकाणी पुढील ३६ ते ४८ तासांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES