[Marathi] मौसमी पावसाने सर्व महाराष्ट्राला व्यापले; पाऊस सुरूच राहणार.

June 28, 2018 3:23 PM | Skymet Weather Team

गेल्या काही दिवसात नैऋत्य मान्सून पावसाने अखेर सर्व महाराष्टामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तथापि, स्काइमेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार सध्या, राज्यातील पाऊस कमी झाला असला तरीही, विदर्भाच्या काही भागांबरोबरच कोकण विभागातील मान्सूनच्या पावसाची तीव्रता कायम राहिली आहे.

विदर्भ व कोकण मध्ये, मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे तर,दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये विखुरलेल्या स्वरूपात, मराठवाडा येथे तुरळक स्वरूपात पावसाची नोंद झाली. या उलट, उत्तर मध्य महाराष्ट्र जवळजवळ कोरडा राहिला आहे.

पावसाची तीव्रता कमी असली तरी सर्व हवामान विभागामध्ये सामान्य पावसापेक्षा थोडा का होईना जास्तीचा पाऊस झाल्यामुळे वातावरण आनंददायक आहे .कोकण विभागाचा पाऊस २७ जून रोजी सामान्य पावसाच्या तुलनेत ५२ % नी अधिक होता ,तर मराठवाडा ४३% अधिक त्यानंतर, मध्य महाराष्ट्र १९% अधिक आणि विदर्भ ४% नी अधिक होता . या पावसाचे कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा केरळ समुद्र किनाऱ्यावर तयार झाला आहे त्यामुळे वारे सध्या दक्षिण गुजरातकडून केरळाकडे वाहत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासात कोकण आणि विदर्भ भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज स्काय मेट वेदर चा आहे. त्यानंतर विदर्भातील पाऊस तीव्रता कमी होईल आणि मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याची तीव्रता लक्षणीय कमी होईल.त्यानंतरच्या ४८ तासात थोडाफार पाऊस होऊ शकतो परंतु महाराष्ट्राचा बहुतांश भाग मात्र कोरडा राहण्याची अपेक्षा आहे.

मुंबई मध्ये पुढील एक ते दोन दिवस हलका पाऊस होऊ शकतो. तसेच रत्नागिरी, वेंगुर्ला, चंद्रपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर आणि वर्धा या शहरांमध्ये पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम स्वरूपात होतील तर वाशिम, नागपूर, अकोला, पुणे, नांदेड आणि नाशिक येथे तुरळक असा पाऊस होऊ शकतो.

हवामानाचा कृषी विभागावर होणार परीणाम पाहू;

पाऊस थोडा कमी झाला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूनी शेतातील पेरणी नंतरची कामे म्हणजे खुरपणी,फवारणी इत्यादी करून घ्यावीत. पालेभाजी व फळबागानमध्ये पानी साचुन राहिले असेल तर ते काढून टाकावे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यतील शेतकरी बंधूनी सोयाबीन, उडीद, बाजरी, कापूस, पारवा वाटाणा, मका, भुईमूग इत्यादी खरीप पेरणी चालू ठेवावी. भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका तयार कराव्यात.

Image Credit: Wikipedia

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

OTHER LATEST STORIES