गेल्या २४ तासांत सक्रिय मान्सूनमुळे कोकण आणि गोव्याच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील २४ तासात ४९ मिमी पावसाची नोंद केली, तसेच अलीबाग येथे ४१ मिमी आणि महाबळेश्वर मध्ये २५ मिमी पावसाची नोंद झाली.
सध्या, दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागावर एक चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. तसेच कोकण आणि गोवापासून केरळ किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ रेषा देखील विस्तारत आहे. ज्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि गोवा येथे एक दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु राहण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ मधील काही भागात ५ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल मात्र विखुरलेला पाऊस सुरु राहील. दुसरीकडे, संपूर्ण आठवड्यात मध्य महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस होण्याचा अंदाज आहे. एक दोन मध्यम ते जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
या पावसाळी हंगामादरम्यान, मुंबई आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. जोरदार सरींची शक्यता देखील असून पावसाचा जोर २८ जून ते १ जुलै दरम्यान झालेल्या पावसाच्या तुलनेने खूपच कमी असेल. एकंदरीत हवामान ढगाळ आणि आरामदायक राहील.
अशा प्रकारे आपण पुढील आठवड्या करीत असे म्हणू शकतो की, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यात मान्सून सक्रिय राहील. या पावसामुळे राज्यात असलेली पावसाची कमतरता थोड्या प्रमाणात कमी होईल. पुढील एक आठवडा तरी महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार नाही. अंतर्गत भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु राहील तर किनारी भागात मान्सून सक्रिय असेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे