[Marathi] महाराष्ट्रात चक्रीवादळ वायुचा प्रभाव कायम, गोंदिया, महाबळेश्वर आणि रत्नागिरी मध्ये पाऊस

June 17, 2019 3:26 PM | Skymet Weather Team

मुंबईसह महाराष्ट्रातील तटीय भागात बऱ्याच दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत, गोंडियात १८ मिमी पावसाची नोंद झाली, त्यानंतर डहाणू मध्ये १३.७ मिमी, महाबळेश्वर मध्ये ११.८ मिमी, रत्नागिरी मध्ये ११ मिमी आणि अलीबाग येथे ४.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

मुंबईतील कोलाबा येथे १.४ मिमी पाऊस पडला आहे, त्यानंतर सांता क्रूझ, येथे ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, चक्रीवादळ वायु आता महाराष्ट्र पासून खूप लांब निघून गेला आहे. तथापि, त्याच्या पोस्ट इफेक्ट्सच्या परिणामी दक्षिण / दक्षिण-पश्चिम दिशेने वारे राज्यावर सुरू झाले आहे. अशा प्रकारे, आज आणि उद्या महाराष्ट्रातील किनारी भागांवर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्यानंतर, पावसाचा जोर किंचित कमी होणे अपेक्षित आहे.

गोंदिया, डहाणू, महाबळेश्वर , रत्नागिरी, अलीबाग, सांताक्रूज आणि कोलाबासारख्या ठिकाणी पुढील २४ ते ४८ पावसाची शक्यता आहे.

याउलट, पुढील २४ ते ४८ तासांपर्यंत महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये पावसाची क्रिया कमी असेल. त्यानंतर, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या विखुरलेल्या पावसाची अपेक्षा आहे.

१९ जून पर्यंत उत्तर-तटीय महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होईल, कारण चक्रीवादळ वायुशी संबंधित वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. तथापि, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासारख्या काही भागांमध्ये मध्यम पाऊस पडत राहील.

२३ जूनच्या सुमारास पावसाचा जोर परत वाढणे अपेक्षित आहे, त्या कालावधीत एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील अपेक्षित आहे. हे उपक्रम 26 जून पर्यंत चालू राहतील आणि या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये तीव्र पाऊस पडेल. मुंबईकरांना मॉन्सूनच्या आगमनासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES