मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. १०४ मिमी पावसासह विदर्भातील ब्रम्हपुरी हे सोमवारी देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले. हि हवामान प्रणाली कायम राहणार असल्याने आजही विदर्भात थोड्याफार मध्यम सरींची शक्यता आहे.
तसेच कोकणातील काही भाग आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर गेल्या २४ तासांत रविवार सकाळी साडेआठ वाजल्यापासून अहमदनगरमध्ये ३६ मिमी, हर्णे मध्ये १५ मिमी आणि महाबळेश्वरमध्ये १४ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, मुंबई, डहाणू आणि ठाणे येथे पावसाचे प्रमाण हलके राहिले असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह वातावरण जवळपास कोरडे झाले आहे.
आमच्या हवामानतज्ञांनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे आज पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तथापि, सक्रिय मान्सूनमुळे, विदर्भात पुढील २४ तास मध्यम प्रमाणात पाऊस चालूच राहण्याची अपेक्षा आहे. उद्यापर्यंत या भागांत मान्सून कमकुवत होईल आणि काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह वातावरण जवळपास कोरडे राहील.
२८ ऑगस्टपर्यंतच मुंबईत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. त्यानंतर पावसाळी गतिविधीत वाढ होऊन एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. पुणे शहरात देखील काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसासह वातावरण कोरडे राहील.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ऑगस्ट च्या सुमारास विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता आहे. हि प्रणाली पश्चिमेकडे सरकणार असल्याने विदर्भ तसेच कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वातावरण मात्र जवळपास कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे.
Image Credits – Newsmobile
Any information taken from here should be credited to Skymet Weather