[Marathi] कोल्हापूर आणि सातारा मध्ये पाऊस, नागपूर मध्ये हलका पाऊस, उष्णतेच्या लाटांपासून सुटका नाही

June 6, 2019 10:37 AM | Skymet Weather Team

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. मुख्यतः दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, येथे बऱ्याच दिवसांपासून पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींची नोंद करण्यात येत आहे. गेल्या २४ तासात, सोलापूर मध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी आता महाराष्ट्रावर जोर पकडणे अपेक्षित आहे व येणाऱ्या दिवसात राज्यातील अजून काही भाग पाऊस अनुभवतील, असे दिसून येत आहे.

दक्षिण कोंकण व गोआ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडणे अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर मध्ये येणाऱ्या २४ ते ४८ तासात, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

होणाऱ्या पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती, जी सध्या दक्षिण पूर्व अरब सागरावर बनलेली आहे. याशिवाय, एक ट्रफ रेषा महाराष्ट्र पर्यंत विस्तारलेली आहे.

होणाऱ्या पावसामुळे, तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल ज्यामुळे हवामान आनंदायी होईल.

याउलट, आता पर्यंत विदर्भात, मुख्यतः नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी व लगतच्या उत्तर मराठवाड्यात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. ह्याचे कारण आहे, उत्तर व उत्तर पश्चिम दिशेने येणारे गरम आणि कोरडे वारे. तथापि, विदर्भाच्या आसपास होणाऱ्या पावसामुळे, विदर्भ क्षेत्र देखील येणाऱ्या २४ तासात हलका पाऊस अनुभवतील. परंतु येथे रहिवाशांना उष्णतेच्या लाटांपासून तूर्तास सुटका मिळणार नाही, असे दिसून येत आहे.

उत्तर मराठवाड्या बदल सांगायचे तर, येथे पावसाची कोणतीही शक्यता नाही दिसून येत आहे, ज्यामुळे येथील रहिवाशांना अजून काही दिवस कोरड्या हवामानाचा सामना करावा लागेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES