[Marathi] नागपूर, परभणी आणि सोलापूर मध्ये पाऊस, मुंबई मध्ये १४ जूनच्या आसपास मॉन्सूनचे आगमन होणे अपेक्षित

June 7, 2019 12:04 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात, महाराष्ट्रात पूर्व मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढलेला आहे. महाराष्ट्रातील चारही विभागात गेल्या २४ तासात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडलेला आहे. तसेच, दक्षिण कोंकण आणि गोव्या मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याउलट, मुंबई मध्ये हवामान मात्र कोरडेच राहिलेले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, केरळात लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार आहे. याशिवाय, एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व अरब सागरावर बनलेला आहे. आधीच एक ट्रफ रेषा केरळ पासून दक्षिण महाराष्ट्र पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोंकण व गोव्याच्या बऱ्याच भागात येणाऱ्या दोन दिवसात विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. याशिवाय, विदर्भात देखील येणाऱ्या ४८ तासात हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु रहिवाशांना उष्णतेच्या लाटांचा अजून काही दिवस सामना करावा लागेल.

नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि पुणे या ठिकाणी पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुभवण्यात येईल.

मुंबई मध्ये आकाश ढगाळसह हलक्या पावसाची शक्यता आहे. ११ जून रोजी पूर्व मॉन्सूनचा जोर मुंबई शहरात वाढेल व १४ किंवा १५ जूनच्या आसपास मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES