Skymet weather

[Marathi] पुणे, औरंगाबाद मध्ये मध्यम तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता

December 22, 2019 4:00 PM |

mumbai weather

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे वातावरण आहे. विदर्भात पहाटे वातावरण थंड व हलके धूके असलेले असून दिवसा उबदार आणि आल्हाददायक वातावरण आहे.

स्कायमेट हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, वातावरणातील वरच्या थरात मध्य पूर्व अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत कोकण किनारपट्टीलगत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. ही प्रणाली आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम विदर्भावर आर्द्र वाऱ्यांचा परिणाम होत आहे.

या वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुढील २४ ते ४८ तासांत या हवामान विभागांवर गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य-महाराष्ट्रात जसे की पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, सातारा, डहाणू, जळगाव, जालना आणि अकोला येथे विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हवामान कोरडे राहील.

रात्रीच्या तापमानात १-२ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर ढगाळ वातावरण आणि त्यानंतरच्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात २-४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try