मॉन्सूनचे केरळात लवकरच आगमन होणार आहे. प्रभावाने, महाराष्ट्रात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचा किंचित जोर वाढलेला आहे. गेल्या २४ तासात, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
गेल्या २४ तासात, सोलापूर मध्ये मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय, परभणी आणि चंद्रपूर मध्ये हलका पाऊस पडलेला आहे. झालेल्या पावसामुळे, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या तापमानात निश्चितच घट दिसून आलेली आहे.
याशिवाय, उष्णतेच्या लाटांचा विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये देखील प्रभाव कमी झालेला आहे, तथापि काही भाग सतत उष्णतेच्या लाटांशी लडत आहे.
स्कायमेटच्या अंदाजअनुसार, येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. कारण, एक ट्रफ रेषा महाराष्ट्राच्या किनारी भागांवर विकसित होईल. शिवाय, एक अजून ट्रफ रेषा छत्तीसगड पासून दक्षिण भारता पर्यंत विस्तारली जाईल, ज्यामुळे, दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यातील एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात येईल, असे दिसून येत आहे.
होणाऱ्या पावसामुळे, विदर्भातील अजून काही भागांना उष्णतेच्या लाट पासून काही काळ सुटका मिळेल.
स्कायमेटनी आधीच आपला अंदाज दिलेला आहे की या वर्षी मॉन्सूनला महाराष्ट्र पर्यंत पोहोचायला जरा जास्तच वेळ लागणार आहे. याशिवाय, पूर्व मॉन्सूनचे हंगाम पण महाराष्ट्रात चांगला पाऊस द्यायला नाकाम झाले आहेत, ज्यामुळे येथे पावसाची कमतरता जाणवत आहे.
महाराष्ट्राच्या चारही विभागात पावसाची कमतरता नोंदवण्यात आलेली आहे. कोंकण आणि गोव्या मध्ये ९८% कमी पाऊस पडलेला आहे, मराठवाड्यात ८०%, व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ७८% कमी पाऊस पडलेला आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे