[Marathi] येणाऱ्या २४ तासात महाराष्ट्रात पाऊस, अरब सागरावर बनलेला पट्टा अजून तीव्र होणे अपेक्षित

June 9, 2019 2:03 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात, दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पावसामुळे तापमानात किंचित घट देखील दिसून आलेली आहे. तथापि, विदर्भातील काही भाग जसे चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी आता पर्यंत उष्णतेच्या लाटांशी लडत आहे.

महाराष्ट्रात झालेल्या पावसाचे कारण आहे एक ट्रफ रेषा जी सध्या दक्षिण महाराष्ट्र पासून केरळच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर आंतरिक कर्नाटक आणि लगतच्या मराठवाडा व तेलंगाणा मध्ये बनलेली आहे.

ह्या हवामान प्रणालीमुळे, संपूर्ण राज्यात उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे, येणाऱ्या दोन दिवसात, दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्या मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भाच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व अरब सागर आणि त्याच्या आसपास बनलेला आहे. येणाऱ्या दिवसात ही हवामान प्रणाली अजून तीव्र होऊन उत्तर/उत्तर पश्चिम दिशेत पुढे जाईल ज्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व कोंकणयातील किनारी भागात येणाऱ्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

येणाऱ्या ८ ते १० तासात अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, वर्धा आणि यवतमाळ ह्या ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. याउलट, विदर्भातील उत्तर भाग येणाऱ्या २४ तासात सुद्धा उष्णतेच्या लाटांचा सामना करतील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES