गेल्या २४ तासात केरळात मध्यम पावसासह गडगडाटी गतिविधी देखील अनुभवण्यात आल्या, तर कर्नाटकच्या किनारी भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस नोंदला गेला. ज्यामुळे तापमानात घट दिसून आली आहे.
स्कायमेटच्या उपलब्ध माहितीनुसार, होनावरमध्ये ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तसेच अगुंबे येथे १८.२ मिमी, मंगळुरूत ६.३ मिमी, कोची १७ मिमी, आलप्पुझा १६.१ मिमी आणि कोट्टायम मध्ये १६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, केरळमधील दक्षिणेकडील भागांमध्ये हलका पाऊस पडला आहे. या पावसाळी गतिविधींचे श्रेय किनारपट्टीलगत असलेल्या व दक्षिण महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या ट्रफ ला दिले जाऊ शकते. हि ट्रफ अजून काही काळ टिकेल ज्यामुळे कर्नाटक किनारपट्टीवर १६ जुलैपर्यंत मध्यम आणि जोरदार पाऊस सुरु राहील. तथापि केरळमधील काही भागात प्रामुख्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.
पुढे, १७ जुलैपासून उपरोक्त प्रणाली अधिक सक्रिय होईल, ज्यामुळे केरळ आणि किनारी कर्नाटकमध्ये पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होईल.
सध्या दक्षिण कर्नाटकमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस अनुभवला जात आहे. दरम्यान उपरोक्त प्रणाली व पश्चिम बंगालच्या पश्चिम मध्य खाडीवरील चक्रवाती प्रणालीच्या प्रभावामुळे, पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये पावसाळी गतिविधी सुरू राहतील.
शिरळी, उडुपी, कारवार, होनावर आणि मंगळुरूसारख्या ठिकाणी जोरदार, तर कन्नूर, कोझिकोड, मलप्पुरम, कोची, बेंगलुरू आणि म्हैसूरसारख्या ठिकाणी मध्यम पाऊस होईल. शिवाय, हा पाऊस सर्व प्रकारच्या पिकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.
तर दुसरीकडे, कर्नाटकचे उत्तर भागात वातावरण उबदार आणि आर्द्र असेल. तथापि, हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे