सध्या, एक नवीन पश्चिम विक्षोभ अफगानिस्तानच्या उत्तर भाग व लगतच्या पाकिस्तानवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावामुळे एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भागांवर बनलेली आहे. दोन्ही हवामान प्रणालीच्या प्रभावाने १० मे पासून उत्तर भारतावर पावसाची प्रक्रिया सुरु होईल.
गेल्या २४ तासात, जम्मू काश्मीरच्या एक दोन ठिकाणी जसे श्रीनगर आणि त्याच्या आसपास हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. याउलट, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचे बहुतांश भाग मात्र कोरडेच राहिले.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, १० मे पासून पावसाची गतिविधी व जोर उत्तर भारतावर वाढणार आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचे बहुतांश भाग चांगल्या पावसाची नोंद करणार.
११ ते १६ मे च्या मध्ये, एका नंतर एक पश्चिमी विशोभ पश्चिम हिमालयावर विकसित होतील, ज्यामुळे गतिविधींचा जोर उत्तर भारतावर वाढेल. खरं तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे.
तसे तर, मे महिन्यात फार कमी पश्चिमी विक्षोभ हिमालय जवळ पोहोचतात परंतु येणाऱ्या आठवड्यात एका नंतर एक हवामान प्रणाली पश्चिम हिमालयावर विकसित होतील, ज्यामुळे येत्या आठवड्यात पावसाची विविध गतिविधी उत्तर भारतावर चांगला जोर पकडेल.
पावसा शिवाय, एक दोन ठिकाणी बर्फवृष्टीची पण शक्यता आहे. कारण पावसामुळे तापमानात लक्षणीय घट दिसून येते, ज्यामुळे बर्फवृष्टीची पण स्थिती निर्माण होते.
इंग्रेजीत वाचा: Fresh spell of rain in Srinagar, Gulmarg, Manali, Shimla, Mussoorie and Nainital likely soon
पर्यटन स्थळ जसे, श्रीनगर, पहलगाम, शिमला, मनाली, कुल्लू, हरिद्वार, नैनिताल मध्ये पावसाची शक्यात आहे. तापमानात लक्षणीय घट दिसून, या स्थळातील हवामान आनंददायी होईल. वैष्णव देवी मध्ये पण पाऊस पडणार, असा दिसून येत आहे.
पुढील १३ मे च्या नंतर, भूस्खलन, अर्थात माती घसरून पडण्याची पण शक्यता आहे, ज्यामुळे पर्यटन स्थळी असलेल्या पर्यटकांना त्रास होऊ शकतो.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे