एक पश्चिमी विक्षोभ जम्मू आणि काश्मीरवर बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, एक दोन ठिकाणी बर्फवृष्टीची पण अपेक्षा आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. जोराच्या पावसाची शक्यता कमी आहे व एक दोन ठिकाणीच पावसाचा जोर किंचित जास्त राहील. एक दोन ठिकाणी भूस्खलन, अर्थात माती घसरून पडण्याची पण शक्यता आहे.
Also read in English: Another rainy day for Kashmir, Himachal and Uttarakhand, landslides likely
१८ मे च्या संध्याकाळ पर्यंत पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव जरा कमी होईल, ज्यामुळे हवामान सुद्धा स्पष्ट होणे सुरु होईल. परंतु, काही ठिकाणी हलका पाऊस पडत राहील.
त्यानंतर, २१ मे रोजी, एक दुसरा पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालया जवळ पोहोचेल, ज्यामुळे परत एकदा जम्मू काश्मीरवर पावसाचा जोर वाढेल. २२ मे रोजी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड देखील पाऊस अनुभवतील. या कालावधीत, एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करतील. २४ मे पर्यंत स्थिती अशीच कायम राहील. आमची अशी अपेक्षा आहे तिन्ही राज्यांवर पावसाची तीव्रता वाढ़ेल.
साधारणपणे, मार्च महिन्या पासूनच पश्चिमी विक्षिभाचा प्रभाव कमी होऊ लागतो. परंतु या वर्षी परिस्थितीत बदल दिसून आलेला आहे. जानेवारी पासून पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करतो व मार्च येत्या प्रभाव कमी होऊ लागतो परंतु, या वर्षी एका नंतर एक पश्चिमी विक्षोभाने उत्तर भारतात हजेरी लावली आहे. आता पर्यंत हवामान प्रणाली उत्तर भारताला प्रभावित करत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे, येणाऱ्या दिवसात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात येईल व हवामान आनंददायी होईल.
तथापि, चारधाम यात्रेच्या यात्रेकरूंना आणि उत्तरेकडील पर्यटकांना भूस्खलनच्या स्वरूपात काही अडचण होऊ शकते.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे