बऱ्याच मोठ्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राच्या आतील भागातील कोरडेपणा थोडासा कमी झाला. शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत औरंगाबाद येथे बसवलेल्या स्वयंम चलित हवामान यंत्राच्या (AWS) नोंदणीनुसार ४५ मिमी पाऊस झाला. तसेच लातूर आणि अहमदनगर येथे अनुक्रमे २३ मिमी आणि २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणि नंदुरबार येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा प्रभाव कर्नाटकाहून पुढे केरळ पर्यंत होतो आहे. या हवामान प्रणालीमुळे मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही भागात पाऊस होईल.
या हवामान प्रणालीचा प्रभाव अजूनही २४ ते ४८ तास होतच राहील आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पाऊस होईल. तसेच विदर्भातहि पाऊस होईल असे अपेक्षित आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा ४३% कमी पाऊस झालेला आहे आणि मराठवाड्यातही ५२% पावसाची कमतरता आहे. आता होणाऱ्या पावसामुळे हि तुट भरून जरी निघणार नसली तरी यामुळे वातावरणातील आर्द्रतेची पातळी वाढेल आणि यामुळे तेथील पिकांना फायदाच होईल.
याबरोबरच जमिनीतील पाण्याचा साठाही कमी झालेला असल्याने तेथील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यास त्रासही होतो आहे आणि यात भर म्हणून मान्सूनचा पाऊसही चांगला झालेला नाही.