Skymet weather

[Marathi] दिल्लीची सकाळ पावसाने, उष्ण वातावरणापासून थोडासा दिलासा

June 29, 2015 4:29 PM |

Rain in Delhiगेले २ ते ३ दिवस दिल्लीकर प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेचा आणि त्याच बरोबर ढगाळ वातावरणाचा सामना करत होते.

पण आज सकाळपासून वरुणदेवता दिल्लीवर खुश झाल्याचे दिसून आले कारण आज सकाळपासून दिल्लीत बऱ्याच भागात चांगलाच पाऊस होतो आहे. पूर्व आणि मध्य दिल्ली व त्याबरोबरच एनसीआर चा भाग म्हणजेच गाझियाबाद, नोयडा आणि फरीदाबाद येथे मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे.

स्कायमेट या संस्थेच्या स्वयंचलित हवामान गणकयंत्रानुसार दादुपूर येथे ४७ मिमी, गाझियाबाद येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली असून नोयडाच्या सेक्टर ३६ येथे ८ मिमी तसेच डीपीएस नोयडा येथे ३४ मिमी पावसाची नोंद झाली तर सफदरजंग येथे तुरळक पाऊस झाल्याचे दिसून आले.

या झालेल्या पावसामुळे दिलीतिल बऱ्याच भागातील तापमानात ६ ते ७ अंश से. ने घसरण झाली आहे. मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अमृतसर आणि हिस्सार वर होत असून कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व आणि मध्य बंगालचा उपसागर या भागांवर निर्माण झाले आहे.

मान्सूनच्या काळात या कमी दाबाच्या पट्ट्याजवळील भागात चांगला पाऊस होतो. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार येत्या काही दिवसात दिल्लीत व्यापक आणि चांगला पाऊस येत राहील कारण हा कमी दाबाच्या पट्ट्याची उत्तर ते दक्षिण मध्ये आंदोलने सुरु राहतील.

तसेच हा होणारा पाऊस विरळ असला तरी या पावसामुळे असह्य उष्णतेपासून दिलासा मात्र नक्कीच मिळेल.

देशाची राजधानी दिल्ली येते २४ तास आल्हाददायक वातावरण अनुभवेल त्यानंतर परत तापमानात वाढ होईल आणि नवीन पावसाची सर साधारणपणे ६ जुलै च्या आसपास येण्याची शक्यता आहे.

 

Image Credit: NDTV






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try