सध्या एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानच्या उत्तर भागांवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या उत्तर भागांवर बनलेली आहे. येणाऱ्या २४ तासात, हि चक्रवाती परिस्थिती उत्तरपश्चिम राजस्थान आणि लगतच्या हरियाणा व पंजाब जवळ पोहोचेल.
विकसित झालेल्या हवामान प्रणाली मुळे, पंजाब आणि हरियाणाच्या काही ठिकाणी धुळीच्या वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
उद्या पर्यंत म्हणजे १० मे सुमारास, पावसाची तीव्रता आणखीन वाढेल आणि आमची अशी अपेक्षा आहे कि या भागातील अजून काही भाग पण पाऊस अनुभतील. याह भागांवर पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी म्हणजे धुळीच्या वादळासह गडगडाटी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, विकसित झालेल्या हवामान प्रणालीची प्रकृती मजबूत असल्या मुळे, पंजाब व हरियाणा मध्ये मॉन्सूनची गतिविधी दिवसं दिवस वाढेल. खरं तर, १३ व १४ मे सुमारास, दोन्ही राज्यांवर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो.
इंग्रेजीत वाचा: Dust storm and rain to affect Punjab and Haryana starting today
स्कायमेटच्या अंदाजानुसार पंजाबचे भाग जसे अमृतसर, चंदीगड, जालंधर, भटिंडा, कपुर्थळा, लुधियाना व पटियाला येथे पावसाची शक्यात दिसून येत आहे. तसेच हरियाणाचे भाग जसे कर्नाळ, हिसार, कुरुक्षेत्र, रोहतक, सिरसा आणि नारनौल या ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की उत्तर-पश्चिम राज्य जसे पंजाब आणि हरियाणा पूर्व-मान्सून हंगामासाठी पूर्ण पणे तैयार आहेत. पूर्व-मान्सूनच्या हवामान क्रियाकलाप मुख्यतः दुपारी किंवा संध्याकाळ पासून घडून येतील.
सध्या या भागातील तापमान ३९ अंश ते ४३ अंशाचा मध्ये नोंदवले जात आहे. आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या पावसामुळे या भागांच्या तापमानात लक्षणीय घट दिसून येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे