जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत विखुरलेल्या हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या काही भागांत तुरळक सरी झाल्यात.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांनी येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीरच्या काही भागात पावसाळी गतिविधींचा अंदाज वर्तविला आहे. याच काळात वैष्णोदेवी, कटरा (जम्मू-काश्मीर) मध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान २६ नोव्हेंबरच्या सुमारास पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. वैष्णोदेवी (कटरा) येथे गडगडाटासह मध्यम पाऊस व हलकी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या तसेच हिमाचल प्रदेशच्या उंच भागातही मध्यम प्रमाणात हिमवृष्टी होऊ शकते. त्यादरम्यान, उत्तराखंडमध्ये हलक्या हिमवृष्टी आणि विखुरलेल्या पावसाळी गतिविधी होऊ शकतात. अशी हवामान स्थिती २७ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील.
जर आपण या कालावधीत माता वैष्णोदेवीला भेट देण्याचा विचार करीत असाल तर पावसामुळे दरडी कोसळण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
२८ नोव्हेंबर नंतर, पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेने सरकण्यास सुरूवात होईल. पावसाच्या पार्श्वभूमीवर, तापमानात लक्षणीय घट होईल ज्यामुळे दिवस थंड आणि रात्री देखील झोंबणारी थंडी असेल.
Image Credits – Yatra.com
Any information taken from here should be credited to Skymet Weather