गेल्या एक आठवड्या पासून राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात येत आहे. एक दोन ठिकाणी गारपीट पण पडले आहे. होणाऱ्या पावसाचे कारण आहे, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या जवळ बनलेली विविध हवामान प्रणाली. याशिवाय, पश्चिम आणि उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली चक्रवाती परिस्थिती. उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे अरब सागर पासून उष्ण वारे राज्यावर वाहत आहे.
आमची अशी अपेक्षा आहे कि १८ मे पर्यंत धुळीचा वादळासह राजस्थान मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील उत्तर भाग जसे बारमेर, जोधपूर, चुरु, हनुमानगढ येथे येणाऱ्या २४ तासात धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. या भागांच्या तापमानात लक्षणीय वाढ पण दिसून आली आहे. या भागांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.
त्यानंतर, पावसाचा जोर किंचित कमी होईल व १९ मे ला धुळीचे वादळ अनुभवले जातील. त्यानंतर, पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होईल, ज्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे हवामान कोरडे होईल. हवामानाची दिशा सुद्धा बदलेल आणि उत्तर पश्चिम दिशेने वारे राज्यावर वाहतील.
Also read in English: Rains and dust storm to continue over Rajasthan till May 19
होणाऱ्या पावसामुळे, राज्यातील तापमानात लक्षणीय घट दिसून आली आहे, ज्यामुळे राज्यांच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.
परंतु, १९ मे नंतर, तापमानात पुन्हा एकदा बदल दिसून येईल. आमची अशी अपेक्षा आहे कि तापमानात परत एकदा लक्षणीय वाढ दिसून येईल. तापमान ४० अंशाचा आसपास नोंदवले जातील, ज्यामुळे उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर, राजस्थान मध्ये येणाऱ्या एक आठवड्यात कोणतीही महत्वपूर्ण हवामान गतिविधी नाही दिसून येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे