[Marathi] पंजाब आणि हरियाणा मध्ये २३ मे पर्यंत पाऊस

May 17, 2019 11:44 AM | Skymet Weather Team

मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करत आहे. त्याच्या प्रभावाने चक्रवाती परिस्थिती भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागांवर बनलेली होती, ज्यामुळे मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच पंजाब आणि हरियाणा मध्ये पाऊस सुरु आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे. याशिवाय, अरब सागरापासून उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे येणाऱ्या दिवसात पंजाब आणि हरियाणा मध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

बनलेल्या हवामान प्रणालीमुळे, पंजाब आणि हरियाणाच्या उत्तर भागात पावसाचे आज पासून पुन्हा एकदा आगमन होईल.

आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या चार ते सहा तासात, अमृतसर, बर्नाला, भटिंडा, फरीदकोट, फतेगढ साहिब, फाझिल्का, फ्रीरोझपूर, गुरुदासपूर, होशियारपूर, जालंधर, कपुर्थळा, लुधियाना, मोगा, मुक्तसर, पठाणकोट, पटियाला, रुपनगर, संगरूर येथे धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. तसेच, हरियाणा मधील उत्तर भागात जसे हिसार, कुरुक्षेत्र आणि अंबाला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Also read in English: Rain and dust storm to continue in parts of Punjab and Haryana until May 23

पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी पंजाबच्या काही भागात उद्या पण दिसून येतील. त्यानंतर, हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल, परंतु काही ठिकाणी हलका पाऊस पडत राहील.

पुढील, २१ मे च्या सुमारास, एक नवीन पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करणार ज्यामुळे पावसाचा जोर पंजाब आणि हरियाणा मध्ये परत वाढणे अपेक्षित आहे.

स्कायमेटच्या मतानुसार, २३ मे पर्यंत पंजाब आणि हरियाणा मध्ये विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. तापमान बदल सांगायचे तर, होणाऱ्या पावसामुळे तापमान सामान्यच्या खाली या सामान्यच्या जवळ बनलेला राहील. उष्णतेची लाट सध्यातरी परतण्याची शक्यता नाही दिसून येत आहे.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES