गेल्या दोन दिवसात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात धुळीचे वादळ अनुभवले गेले. दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या दक्षिण पूर्व भागात गेल्या २४ तासात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. याउलट, राज्यातील बाकी भाग गरम आणि कोरडे हवामान अनुभवत आहे. या गतिविधींचे कारण आहे संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली.
हवामान प्रणाली
सध्या, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पंजाब आणि हरियाणा मध्ये बनलेली आहे. दोन्ही हवामान प्रणाली उत्तर पूर्व दिशेत चालली आहे.
याशिवाय, येणाऱ्या दिवसात एका नंतर एक चक्रवाती परिस्थिती विकसित होईल आणि उत्तर पश्चिम भागांवर पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी वाढतील. येणाऱ्या ४ ते ५ दिवसात एक नवीन चक्रवाती परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पूर्व मॉन्सूनचा जोर उत्तर भारतावर वाढेल आणि येणाऱ्या दिवसात राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस अनुभवला जाईल.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशचे भाग धुळीचा वादळासह हलका पाऊस अनुभवतील, ज्यामुळे तापमानात देखील घट दिसून येईल.
या गतिविधींमुळे, दिवसाच्या तापमानात देखील घट दिसून येईल. आमची अशी अपेक्षा आहे की दिवसाच्या तापमानात येणाऱ्या एक ते दोन अंशाची घट दिसून येईल. याउलट, रात्री हवामान मात्र आरामदायक होईल आणि हवामानाच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येईल.
Also read in English: Uttar Pradesh heads forth for more dust storms and light rains in patches
याशिवाय, धुळीमुळे प्रदूषणाचा स्तर घटणार व आमची अशी अपेक्षा आहे की प्रदूषण खराब श्रेणीत पोहोचेल.
याउलट, राज्यातील पूर्व भागातील हवामान मात्र गरम आणि कोरडेच राहणार. येथे तापमान पण सामान्यपेक्षा अधिक नोंदवला जाईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे