स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, राजस्थान राज्यात पूर्व मॉन्सून गतिविधींचा आज पासून आगमन होईल. कारण आहे संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागांवर बनलेली आहे. याशिवाय, अरब सागरपासून उष्ण वारे राजस्थानवर वाहत आहे. या सगळ्या हवामान प्रणालीमुळे येणाऱ्या ४ ते ५ दिवसात, राजस्थानातील बहुतांश भाग चांगला पाऊस अनुभवतील.
आधीच, राजस्थानच्या बऱ्याच भागात मुख्यतः पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागांच्या आकाशात ढगाळ दिसून येत आहे.
Also read in English: Rajasthan to witness rain and dust storm activities starting today
आज दुपार पासून, राजस्थानातील बऱ्याच भागात धुळीचा वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे. हळू - हळू पावसाची गतिविधी आणि जोर वाढेल आणि राजस्थानातील आणखीन भाग पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी अनुभवतील.
अजमेर, अलवार, बारमेर, भरतपूर, चुरु, जयपूर, जैसलमेर, जोधपूर, हनुमानगढ, जालोर, झालावार, बुंदी, चित्तोडगढ आणि कोटा, या ठिकाणी पावसाची शक्यात दिसून येत आहे.
सगळ्यात आधी राजस्थानचे उत्तर पश्चिम भाग पावसाची नोंद करतील. त्यानंतर, दक्षिण पश्चिम आणि पूर्व राजस्थान देखील धुळीचा वादळासह गडगडाटी पाऊस अनुभवातील. मेघगर्जनेची पण शक्यात दिसून येत आहे.
राजस्थानातील भाग येणाऱ्या ४ ते ५ दिवस, म्हणजे १७ मे पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचे आनंद घेतील. त्यानंतर, हवामान पुन्हा एकदा संपूर्ण पणे कोरडे होईल.
पावसामुळे राज्याच्या कमाल तापमानात देखील लक्षणीय घट नोंदव्यात येईल व दिवसाचे तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जातील.
याशिवाय, तापमानात घट येऊन, राजस्थानच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून पण सुटका मिळेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे