गेल्या २४ तासात, राजस्थानच्या बऱ्याच भागात धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरं तर, गेल्या दोन दिवसांपासून, राज्यातील बहुतांश भाग पावसाची नोंद करत आहे.
काल जयपूर आणि बिकानेर मध्ये धुळीचा वादळासह हलका पाऊस पडला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, होणाऱ्या पावसाचे कारण आहे राजस्थानच्या उत्तर भागांवर बनलेली चक्रवाती परिस्थिती. याशिवाय, एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानवर बनलेला आहे. आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या दिवसात पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीर जवळ पोहोचेल, ज्यामुळे राजस्थानवर बनलेली चक्रवाती परिस्थितीचा प्रभाव वाढेल आणि राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद करण्यात येईल.
Also read: Dust storm followed by rain and hailstorm to occur in Rajasthan during next 24 hours
२२ आणि २३ मे ला, राज्यातील बहुतांश भागात पावसाची नोंद करण्यात येईल. एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे. याशिवाय, एक दोन ठिकाणी गारपिटीची पण शक्यता आहे. जोराच्या वेगाने वारे सुद्धा वाहतील.
ह्या गतीविनधींमुळे, कमाल तापमान जे आता पर्यंत ४० अंशाचा वर होते, त्यातही २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल. एक दोन ठिकाणी ३ ते ४ अंशांची लक्षणीय घट पण दिसून येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवामान रहिवाशांसाठी आरामदायक होईल.
पूर्व मान्सून हंगामाच्या सुरुवाती पासूनच, राजस्थान मध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. खरं तर, राजस्थान राज्य उत्तर भारतातील एकमात्र अशे राज्य आहे, जेथे चांगल्या पूर्व मॉन्सूनच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या पावसानंतर, हवामान २४ किंवा २५ मे च्या आसपास पुन्हा एकदा कोरडे होईल. याशिवाय, कोणत्याही दुसऱ्या पश्चिमी विक्षोभाची सध्या तरी उत्तर भारताला प्रभावित करण्याची शक्यता नाही दिसून येत आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे