आता पर्यंत उत्तर-पश्चिम भागात कोरडे हवामान अनुभवण्यात येत होते, ज्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या कमाल तापमानात काही अंशांनी वाढ दिसून आली होती.
परंतु, आता, एक नवीन पश्चिमी विक्षोभ लवकरच जम्मू काश्मीर जवळ पोहोचेल. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम राजस्थान आणि त्याच्या आसपास विकसित होईल.
ह्या प्रणालीमुळे आज पंजाब आणि हरियाणाच्या काही ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात येईल. उद्या पर्यंत पावसाच्या तीव्रतेत लक्षणीय वाढ दिसून येईल.
२२ आणि २३ मे ला, पंजाब आणि हरियाणा मधील बहुतांश भागात पूर्व मॉन्सूनच्या पावसाचा आगमन होईल. या काळात, जोराच्या वेगाने वारे सुद्धा वाहतील. याशिवाय, वाढलेल्या तापमान आणि उष्णतेमुळे, एक दोन ठिकाणी गारपिटीची पण शक्यता दिसून येत आहे.
Also read in English: Dust storm to commence over Punjab and Haryana today, pre-Monsoon rains to follow
पूर्व मॉन्सूनचा पाऊस २३ मे पर्यंत दोन्ही राज्यांवर चालू राहील. त्यानंतर, २४ मे पासून, हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल, तथापि, पंजाबच्या उत्तर भागात थोड्या अजून वेळ पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
२५ मे पासून, दोन्ही राज्यांचे हवामान पूर्ण पणे कोरडे होईल, ज्यामुळे तापमानात येत्या चार ते पाच दिवसात वाढ दिसून येईल. याशिवाय, सध्या कोण्हीती दुसरी हवामान प्रणाली, भारताला प्रभावित नाही करणार, असा दिसून येत आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे