गेल्या २४ तासात, पंजाब आणि हरियाणा मधील बहुतांश भागात हवामान कोरडे राहिले आहे. याउलट, हरियाणाच्या एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक नवीन पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या जवळ पोहोचतो आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे. याशिवाय, एक ट्रफ रेषा उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागांपर्येंत विस्तारलेली आहे.
Also read in English: Dust storm and rain in Chandigarh, Amritsar, Patiala, Ambala, Karnal and Panipat likely
बनलेल्या हवामान प्रणालीमुळे आमची अशी अपेक्षा आहे की दोन्ही राज्यांवर आता पावसाचा जोर वाढेल. आज दोन्ही राज्यातील बहुतांश भागात धुळीचा वादळासह विखुरलेल्या पावसाची शक्यात आहे. एक दोन ठिकाणी मेघगर्जनेची पण शक्यता आहे. याशिवाय, जोरदार वेगाने देखील वारे वाहतील. पूर्व मॉन्सूनच्या ह्या गतिविधी दुपारी किंवा संध्याकाळी घडतील.
या काळात, एक दोन ठिकाणी गारपिटीची पण शक्यात दिसून येत आहे.
याशिवाय, येणाऱ्या दोन दिवसात, होणाऱ्या पावसामुळे, दोन्ही राज्यातील कमाल तापमान ४० अंशाचा खाली नोंदवले जातील, ज्यामुळे ढगाळ आकाशासह हवामान मात्र आरामदायक होईल.
२४ मे नंतर, बनलेल्या हवामान प्रणाली पूर्व दिशेत जातील, ज्यामुळे पूर्व मॉन्सूनच्या पावसाचा जोर दोन्ही राज्यांवर कमी होईल. त्यानंतर, तापमान एकदा पुन्हा वाढणे अपेक्षित आहे.
आमची अशी अपेक्षा आहे की हा पाऊस या हंगामातील शेवटचा पाऊस असेल. त्यानंतर, येणाऱ्या दिवसात, कोणत्याही पश्चिमी विक्षोभ किंवा चक्रवाती परिस्थितीची सध्या तरी शक्यता नाही दिसून येत आहे. हवामान कोरडे झाल्यावर, दक्षिण हरियाणात पुन्हा एकदा उष्णतेची लाट अनुभण्यात येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे