काल दिल्ली एनसीआर मध्ये संध्याकाळच्या वेळी धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात आली. यापूर्वी, ३ मे ला पाऊस अनुभवला गेला होता. परंतु, त्यानंतर, दिल्ली मध्ये हवामान गरम व कोरडेच राहिले. तापमान पण सामान्यपेक्षा अधिक नोंदवले जात होते.
गरम आणि कोरडे हवामानाचे कारण आहे, पश्चिम दिशेने येणारे वारे. या वाऱ्यांमुळे, प्रदूषणाचा स्तर पण दिल्ली, नोएडा, गुरुराम आणि फरिदाबाद मध्ये खराब श्रेणीत पोहोचला होता.
Also read: Delhi, Noida, Gurugram, Ghaziabad and Faridabad to witness dust storm and pre-Monsoon rains
परंतु, काल झालेल्या पावसामुळे, हवामानाच्या स्थितीत सुधारणा दिसून आलेली आहे. काल दिल्लीच्या बऱ्याच भागात धुळीचे वादळ व मेघगर्जनेसह पावसाची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रदूषणाच्या स्तरात सुधारणा दिसून आलेली आहे.
तसेच, राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह पाऊस गेल्या काही दिवसांपासून अनुभवण्यात येत आहे. येणाऱ्या दिवसात पण, राजस्थान मध्ये धुळीचे वादळ अनुभवले जातील ज्यामुळे या राज्यात प्रदूषणाचा स्तर घटणार, असा दिसून येत आहे.
भारतावर बनलेली विविध हवामान प्रणालीवर एक नजर
एक चक्रवाती परिस्थिती राजस्थान मध्ये बनलेली आहे. याशिवाय, एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करत आहे, ज्यामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, गाजियाबाद आणि फरिदाबाद मध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसात संध्याकाळच्या वेळी पूर्व मॉन्सूनच्या पावसाची शक्यता आहे.
या गतिविधींमुळे, दिल्ली आणि आसपासच्या भागात, दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट दिसून येईल. याशिवाय, पुढच्या काही दिवस उष्णतेची लाट परतण्याची शक्यता नाही दिसून येत आहे. झालेल्या पावसामुळे रहिवाशांना प्रचंड गरमी पासून नक्कीच सुटका मिळाली आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे