[MARATHI] १३ जून पासून भारतात सर्वत्र व्यापक पाऊस अपेक्षित

June 11, 2015 4:45 PM | Skymet Weather Team

केरळ, तामिळनाडू कर्नाटकातील काही भाग आणि ईशान्य भारतात सर्वत्र नैऋत्य मान्सून आता जोमाने सुरु झालेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील उर्वरित भाग तसेच तेलंगाणा, छत्तीसगड, पश्चिमबंगालचा काही भाग आणि बिहार येथे मान्सून १० जूनला येण्याचे अपेक्षित होते.
पण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशोबा या चक्रीवादाळामुळे मान्सूनच्या आगमनाला थोडासा उशीर होत असून हे वादळ आता ओमानच्या दिशेने पुढे सरकले आहे आणि जाता जाता सोबत समुद्रातील साठलेली उर्जा (आर्द्रता आणि वारे यांच्या स्वरुपात) घेऊन गेले आहे. हि गेलेली उर्जा भरून निघण्यास थोडा वेळ लागेल आणि मगच मान्सून सुरळीतपणे सुरु होऊ शकेल.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि मान्सूनच्या उशिरा होणाऱ्या आगमनाचा आणि मान्सून काळात किती पाऊस होईल याचा काहीच संबंध नाही. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार संपूर्ण भारतात १३ जून पासून चांगलाच पाऊस होण्याची अपेक्षा आहे कारण बऱ्याच प्रकारच्या हवामान प्रणाली तयार झालेल्या असून त्याचा परिणाम पावसाच्या स्वरुपात होईल. आणि बऱ्याच भागांसाठी हि मान्सूनच्या आगमनाची नांदीच असेल.

या महिन्यातील सर्वाधिक पाऊस याच काळात होईल आणि हा पाऊस साधरणपणे १६ जून पर्यंत सुरु राहील. स्कायमेट या संस्थेतील हवामान शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे याच काळात पश्चिमी वारे बळकट होऊन पश्चिम किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि किनारपट्टी लगतच्या आणि आतील भागात पाऊस सुरु होईल.
याच काळात मध्यप्रदेश आणि लगतच्या उत्तर प्रदेशावर चक्रवाती अभिसरणाची प्रणाली उत्पन्न होत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्र, तेलंगाणा आणि कर्नाटकापर्यंत होणार असून त्या भागात सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढण्यास मदतच होणार आहे.

बिहार आणि पश्चिम बंगाल मधील पाऊस
बिहार आणि पश्चिम बंगालवर चक्रवाती हवेची प्रणाली आहेच आणि अजून एक प्रणाली १५ जूनच्या आसपास तयार होण्याची शक्यता असल्याने पूर्वेकडील भागात यामुळे मान्सुनची ताकद वाढण्यास मदतच होणार आहे आणि त्यामुळे या भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

उत्तर भारतातील पाऊस
जम्मूकाश्मीर वर निर्माण झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे तेथील डोंगराळ भागात तुरळक पाऊस येत आहे. तसेच पाकिस्तान आणि लगतच्या राजस्थानवर चक्रवाती हवेची प्रणाली तयार झाली आहे. या दोन्ही प्रणालींचा एकत्रित परिणाम १३ ते १६ जून च्या दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशात पाऊस आणि वादळी पावसाच्या स्वरुपात होईल.

ईशान्य भारतातील पाऊस
ईशान्य भारतात मान्सूनची हजेरी लागलेली असून त्या भागात चांगलाच पाऊस होतो आहे. अरुणाचल प्रदेशाचा काही भाग, आसाम आणि मेघालयात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आसाम तर आताच पुराचा सामना करत असून याची तीव्रता पावसामुळे वाढण्याची शक्यता आहे.
नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा यांच्या उपभागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

Image Credit: eprahaar.in

 

 

OTHER LATEST STORIES