यापूर्वीच स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार मागील २४ तासांत पुण्यात मुसळधार पाऊस पडला.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस पडत आहे. या आधी ५६ मि.मी. मुसळधार पाऊस पडला होता, तरगेल्या २४ तासांत शहरात ८५ मिमी पाऊस झाला आहे.या मान्सून हंगामात सप्टेंबर महिन्यात पुण्यात हा सर्वात जास्त नोंदवला गेलेला पाऊस आहे. खरं तर, हे दोन दिवस सर्वात जोरदार पावसाचे दिवस होते.
या पावसाचा परिणाम मुंबई-पुणे हाइवेवरही झाला ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
उद्यापर्यंत हा मुसळधार पाऊस सुरू राहील, अशी आमची अपेक्षा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची लाट सक्रिय असल्याने येत्या काही दिवसांत शहरात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही उद्यापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल.
खरं सांगायचं तर, पुण्यात सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच हवामान कोरडे झालेले नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात हलका ते माध्यम पाऊस सुरूच आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिशेष आहे.
Image Credits – Of Paneer, Pulao and Pune
Any information taken from here should be credited to Skymet Weather