पुण्यात २१ तासांमध्ये २५ मिमी पाऊस, सरी सुरूच राहणार, एक दोन तीव्र सरींची देखील शक्यता

September 19, 2019 12:06 PM | Skymet Weather Team

पुण्यात गेल्या २१ तासांत आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत २५ मि.मी. पाऊस पडला. शहरासाठी पावसाळ्याच्या हंगामात सप्टेंबर महिन्यात हा पाऊस आतापर्यंतचा जोरदार पाऊस ठरला आहे.

आतापर्यंत हलका पाऊस सुरूच होता, तथापि, गेल्या चोवीस तासांत शहरात काही प्रमाणात जोरदार सरी पडल्या आहेत.

येत्या चोवीस तासांत पुण्यात पाऊस सुरु राहील. पाऊस आणि गडगडाटी वादळाची काही तीव्र सरी दिसू शकतात आणि त्याचबरोबर आज शहर व त्याच्या आसपासच्या भागातही काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

तथापि, मुसळधार पाऊस अपेक्षित नाही आहे आणि पावसाळी गतिविधींमध्ये लवकरच घट होईल, त्यानंतर आणखी चार ते पाच दिवस हलक्या तीव्रतेसह पाऊस सुरू राहील.

मध्यम सरीसह हवामान आनंददायी होईल.आणि अशीच स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे. पुणेकरांसाठी हवामान सोयीस्कर व सुखद राहील.

Image Credits – Hindustan Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES