[Marathi] पावसामुळे पुण्यात आल्हाददायक वातावरण, तुरळक सरींची शक्यता

October 13, 2019 2:13 PM | Skymet Weather Team

चांगल्या पावसानंतर पुणे शहर व आसपासच्या भागात पावसाळी गतिविधी कमी झाल्या आहेत. इतकेच की गेल्या २४ तासांत शहरातील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहिले आहे.

तथापि, अलीकडील काळात झालेल्या पावसानंतर, पहाटे आणि रात्री वातावरण आल्हाददायक झाले आहे, तर अंशतः ढगाळ ते ढगाळ वातावरणासह दिवस किंचित उबदार आहे.

हवामान प्रणालींविषयी सांगायचे तर, कर्नाटकच्या किनारपट्टीवर एक कमकुवत चक्रवाती परिभ्रमण उपस्थित असून या प्रणालीपासून एक कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेला आहे.

या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, येत्या २४ ते ३६ तासांच्या दरम्यान, गडगडासह तुरळक सरींची शक्यता असून त्यामुळे सकाळ आणि रात्रीच्या वेळी वातावरणात सुखद गारवा येईल. तथापि, दिवसा मात्र थोडी गरमी राहील.

दरम्यान २४ ते ३६ तासांनंतर, पावसाळी गतिविधी कमी होतील, परंतु १७ ऑक्टोबरनंतर पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे.

याकाळात दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान २१ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

पुण्याप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच शहरात प्रामुख्याने कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथे पुढील काही दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस अनुभवला जाईल.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES