Skymet weather

[Marathi] पुणे येथे तुरळक सरी; नाशिक, नागपूर येथे मात्र हवामान कोरडे

November 22, 2017 6:32 PM |

Rain-in-Puneगेल्या २४ तासात विदर्भातील काही भागात तसेच मध्य-महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे व राज्यातील अनेक ठिकाणी देखील वातावरण ढगाळ अनुभवण्यात आले.

यापावसाचे मुख्य श्रेय राज्यावर आणि आसपासच्या प्रदेशावर असलेल्या हवामान प्रणालीस दिले जाऊ शकते. प्रामुख्याने एक कमी दाबाचा पट्टा कोमोरिन ते दक्षिण कोकण आणि गोव्यापर्यंत विस्तारलेला असून, छत्तीसगढ व शेजारच्या भागांवर देखील एक चक्रवाती क्षेत्र उपस्थित आहे. याशिवाय, पूर्व-आग्नेय दिशांमधून दमट वारे मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात आर्द्रता आणत आहेत.

[yuzo_related]

स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार पुढील २४ तासांत मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोवा या भागात गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर, मात्र हवामान पुन्हा कोरडे राहील. पुण्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते, तर नाशिक, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे मात्र वातावरण कोरडेच राहील. तसेच, मुंबईत देखील हवामान कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे.

Click here to check the Live Lightning and Thunderstorm status over MaharashtraMumbai

सामान्यत: वर्षाच्या शेवटी, महाराष्ट्रातील हवामान मुख्यतः कोरडेच राहते, मात्र जेव्हा एखादा सक्रिय हवामान प्रणाली, उदा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होवून पश्चिमेच्या दिशेने प्रवास करते, तेव्हा मात्र राज्याच्या अंतर्गत भागांवर काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे जेव्हा महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत चक्रवाती क्षेत्र निर्माण होते त्यामुळे देखील कोकण व गोव्यात पाऊस होतो.

सद्य हवामानाची परिस्थिती पाहता वर उल्लेखलेल्या दोन्हीपैकी एकही क्षेत्रात कोणतीही लक्षणीय हवामान प्रणालीची अपेक्षा नाही. त्यामुळे, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाची शक्यता नाही म्हणणेच योग्य राहील.

Image Credit: Trek Earth

येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीकरिता skymetweather.com चा संदर्भ देणे अनिवार्य आहे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try