गेल्या २४ तासांत कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा जोरदार प्रभाव कायम राहिला. तसेच कोकणात बऱ्याच भागात तीन अंकी पाऊस झाला आहे. कोकण व्यतिरिक्त विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
गेल्या २४ तासांत, अलिबाग मध्ये १२२ मिमी, सांताक्रूझ मध्ये १४४ मिमी, डहाणू मध्ये १७७ मिमी, ठाणे मध्ये ५७ मिमी, वर्धा मध्ये ५२ मिमी, ब्रह्मपुरी मध्ये ६३ मिमी, नांदेड मध्ये ६० मिमी, बुलडाणा मध्ये ५५ मिमी, हर्णै मध्ये ८१ मिमी, रत्नागिरी मध्ये ६६ मिमी, परभणी मध्ये ४० मिमी आणि सातारा मध्ये ४८ मिमी पाऊस झाला आहे.
या पावसाचे श्रेय कोकण क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या मान्सूनच्या लाटांना देता येईल. तसेच, एक ट्रफ रेषा जी गुजरात पासून ओडिशाच्या किनारी भागानपर्येंत, महाराष्ट्र आणि तेलंगाणा पासून होऊन समुद्रपाटीपासून ६.६ किमी पर्यंत पसरली आहे. येत्या २४ तासांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
मुंबई व अलिबाग क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील किनारी भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, हर्णै, वेंगुर्ला, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबादच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून १०० मिलीमीटर पावसाची नोंद देखील होऊ शकते. कालपर्यंत, कोकणात हंगामी पाऊस अधिक, २९ टक्के इतका होता, मध्य महाराष्ट्रात पावसाची ३७ टक्के वाढ झाली आहे तर मराठवाडा साधारणत पावसाची तूट २५ टक्के इतकी आहे.