[Marathi] पुण्यात पूर्व मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात, पावसामुळे हवामान आनंददायी

June 7, 2019 7:58 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पूर्व मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, पुण्यात देखील आज काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सध्या एक ट्रफ रेषा पश्चिम मध्य प्रदेश पासून दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत विस्तारलेली आहे. याशिवाय, अरब सागरपासून उष्ण वारे वाहत आहे. विकसित झालेल्या ट्रफ रेषेमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात जसे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि आसपासच्या भागात ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता आहे.

सध्या, पुण्यात आकाश ढगाळसह पाऊस सुरु आहे व सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे कि येणाऱ्या काही तासात सुद्धा पूर्व मॉन्सूनचा पाऊस पुण्यात सुरु राहील. याशिवाय, ३० ते ४० किलोमीटरच्या वेगाने वारे देखील वाहतील. येणाऱ्या एक ते दोन तासात पुण्यात आणखीन काही ठिकाणी पाऊस अनुभवला जाईल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात पुण्यातील अजून काही भाग पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुभवतील. त्यानंतर, हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल व १३ जून रोजी पूर्व मॉन्सूनच्या पावसाची परतण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, केरळात लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार आहे. याशिवाय, एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व अरब सागरावर बनलेला आहे. आधीच एक ट्रफ रेषा केरळ पासून दक्षिण महाराष्ट्र पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोंकण व गोव्याच्या बऱ्याच भागात येणाऱ्या दोन दिवसात विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. याशिवाय, विदर्भात देखील येणाऱ्या ४८ तासात हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु रहिवाशांना उष्णतेच्या लाटांचा अजून काही दिवस सामना करावा लागेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES