Skymet weather

[Marathi] पुण्यात ७८ मिमी सामान्य पावसाच्या तुलनेत १९८ मिमी पाऊस, नाशिकमध्येही पावसाने सरासरी ओलांडली

October 22, 2019 4:15 PM |

Pune weather forecast

सुमारे १०० किमी अंतरावर असलेले पुणे आणि नाशिक ह्या शहरांत नैऋत्य मान्सूनमध्ये चांगला पाऊस होतो. तथापि, एकदा हंगाम संपला की हवामान विषयक गतिविधी जवळजवळ मंदावतात. पावसाळी हंगामानंतर हवामान आल्हाददायक होते व तापमान देखील १८ ते २० अंश सेल्सिअस च्या आसपास असते.

यावर्षी, नैऋत्य मान्सूनच्या हंगामात दमदार पाऊस पडलाच परंतु हंगाम संपल्यानंतर ईशान्य मान्सूनच्या हंगामात ज्यामध्ये जास्त पाऊस अनुभवला जात नाही, त्या काळात देखील अभूतपूर्व पाऊस होत आहे. इतकेच नाही तर दोन्ही शहरांनी अवघ्या चार दिवसात पावसाच्या सरासरीला सहजपणे पार केले आहे.

पुण्यात ऑक्टोबरच्या सरासरी ७८ मिमी पावसाच्या तुलनेत १९८ मिमी म्हणजेच जवळपास दुपटीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये आतापर्यंत सरासरी ६३मिमी पावसाच्या तुलनेत ९८ मिमी पाऊस झाला आहे.

या पावसाच्या पार्श्वभूमीवर, शहरांतील तापमानही कमी झाले आहे. नाशिकमध्ये सामान्यपेक्षा ५ अंशांनी, तर पुण्यात ३ अंशांनी तापमानात घट झाली आहे.

या सर्वासाठी कारणीभूत दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये असलेला कमी दाबाचा पट्टा आहे. ही प्रणाली महाराष्ट्र किनारपट्टीजवळ येत असून परिणामी दोन दिवसांत या दोन्ही शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे.

त्यानंतर, प्रणाली सरकल्यामुळे पाऊस ओसरेल, परंतु उर्वरित महिनाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहिल. आगामी एक आठवडा तापमान सामान्यपेक्षा कमी राहील ज्यामुळे वातावरण सुखद होईल.

पुणे आणि नाशिक पश्चिम घाटाच्या खालच्या बाजूस अनुक्रमे १८०० फूट आणि २००० फूट उंचीवर आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत वातावरण आल्हाददायक राहील आणि डिसेंबरच्या उत्तरार्धात व जानेवारीत तापमान एक अंकी होईल.

Image Credits – Panner, Pulao and Pune 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try