स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, गेल्या २४ तासात, पंजाबच्या काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. पंजाबचे भाग जसे भटिंडा आणि पटियाला, येथे हलका पाऊस पडला आहे.
स्कायमेटचा मत आहे कि पडलेल्या पावसाचे कारण आहे संपूर्ण भरतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या उत्तर भागांवर बनलेली आहे, ज्यामुळे आज पावसाचा जोर पंजाब राज्यात वाढणार, असे दिसून येत आहे. पंजाबचे आणखीन काही भाग देखील आज पाऊस अनुभवतील.
पंजाबचे भाग जसे अमृतसर, भटिंडा, पटियाला, आनंदपूर साहिब, चंदीगड, जालंधर, कपुर्थळा, लुधियाना आणि पठाणकोट मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह हलक्या ते मध्यम गडगडाटी पावसाची शक्यता आहे.
Also read in English: More pre Monsoon rains ahead for Punjab, Haryana to witness dust storm and rain starting today
याशिवाय, एक दोन ठिकाणी गारपीटची पण येणाऱ्या दोन ते तीन दिवसात शक्यता आहे, ज्यामुळे ज्वार पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.
तसेच, आज संध्याकाळ किंवा रात्री पर्यंत हरियाणा राज्यात पण पावसाची सुरुवात होईल. आमची अशी अपेक्षा आहे की हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह हलका पाऊस पडेल व उद्या पर्यंत पावसाचा जोर आणखीन वाढेल आणि हरियाणातील बऱ्याच भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात येईल.
तापमान बदल सांगायचे तर, दोन्ही राज्य होणाऱ्या पावसामुळे आपल्या कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदवतील. दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या किंवा त्याच्या खाली नोंदवले जातील. एक दोन ठिकाणी तर तापमान ३५ अंश पर्येंत पण नोंदवले जाऊ शकतात.
ज्यामुळे येणाऱ्या एक आठवड्यात हवामान आरामदायक राहील व उष्णतेची लाट पासून रहिवाशांना सुटका मिळेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे