सध्या, विदर्भातील एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. परंतु, दक्षिण पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे, गेल्या २४ तासात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांच्या तापमानात घट दिसून आली आहे. या वाऱ्यांमुळे विदर्भातील पश्चिम भागांच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.
खरं तर, आर्द्र वारे, उत्तर अरब सागर पासून घेऊन, गुजरात पासून होऊन, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या वाहत आहे. स्कायमेटचा अंदाज आहे कि ११ मे पर्येन्त अशीच स्थिती कायम राहणार. त्यानंतर, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये ११ आणि १२ मे ला हलक्या पावसाची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा दिसून येत आहे. त्यानंतर, १३ ते १५ मे च्या मध्ये हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल. परंतु १६ आणि १७ मे ला राज्यातील काही ठिकाणी परत पाऊस परतण्याची शक्यता आहे.
इंग्रेजीत वाचा: Pre-Monsoon showers to help in abatement of heat wave from parts of Maharashtra
पावसाचे कारण, विदर्भ आणि मराठवाडयावर विकसित होणारी ट्रफ रेषा आहे, जी आंतरिक कर्नाटक पर्येन्त विस्तारली जाईल.
पूर्व मॉन्सूनच्या हंगामात, कोंकण व गोव्यातील हवामान संपूर्ण पणे कोरडे राहतात. परंतु, अधूनमधून विदर्भ आणि मराठवाड्याच्या जवळपास विकसित झालेल्या ट्रफ रेषे मुळे, पूर्व मान्सून गतिविधी पावसाच्या रूपात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात नोंदाव्यात येते.
जून महिन्यात पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रावर वाढतो आणि चांगल्या पावसाची नोंद करण्यात येते.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे