[Marathi] १०-१५ मे पासून संपूर्ण भारतात पूर्व मॉन्सून गतिविधींना सुरुवात

May 7, 2019 9:56 AM | Skymet Weather Team

मागील १५ ते १७ एप्रिल दरम्यान देशात पूर्व मॉन्सूनच्या हंगामातील पहिला पाऊस पडला होता. नुकत्याच झालेल्या फनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तर भारत आणि देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्ये वगळता उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात असलेल्या राज्यांमध्ये गरम आणि कोरड्या हवामानाची परिस्थिती प्रचलित आहे.

दरम्यान चक्रीवादळ फनी आता शेवटी संपुष्टात आलं असून देशाच्या बहुतेक भागातील हवामान पुन्हा कोरडे झाले आहे. यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. खरं तर, संपूर्ण उत्तरपश्चिम आणि मध्य भारतामध्ये उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे.

तथापि, असे दिसते की देशाची लवकरच उष्णते पासून सुटका होईल. हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार, आता १० मेपासून देशात पूर्व-मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, आणि हि गतिविधी साधारण १५ मे पर्यंत राहण्याची शक्यता आहे. हि पावसाळी गतिविधी मुख्य कारण असेल ज्यामुळे देशाची प्रामुख्याने मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा आणि रायलसीमा या राज्यांची चालू असलेल्या उष्ण हवामानापासून सुटका होईल.

विविध हवामान प्रणाली:

आगामी पूर्व-मॉन्सून गतिविधींचे प्रमुख कारण देशाच्या विविध भागांवर उद्भवणाऱ्या हवामान प्रणाली ठरू शकतात. उत्तरेबद्दल सांगायचे तर १० आणि १३ एप्रिल रोजी येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे पश्चिम हिमालय प्रभावित होणार असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे राजस्थान आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

इंग्रेजीत वाचा: Pre-Monsoon rains to commence in Punjab and Haryana around May 10

एक ट्रफ रेषा उत्तरेकडील पठारी भागापासून पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारेल, ज्यामुळे पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होईल. त्याचबरोबर, उप-हिमालयी पश्चिम बंगालवर एक चक्रवाती परिस्थिती देखील उद्भवेल.

तसेच उत्तर प्रदेश ते दक्षिण पूर्व अरबी समुद्रापर्यंत आणखी एक ट्रफ रेषा विस्तारेल, व मध्य-भारतावर विभिन्न वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार होईल.
हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार, जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा एकाच वेळी विविध हवामान प्रणालींची निर्मिती अनुभवली जाते, त्या एकमेकांना पूरक असतात आणि दीर्घ कालावधीसाठी राहतात. अशाप्रकारे, मोठ्या क्षेत्रावर दीर्घकाळापर्यंत हवामान गतिविधी सुरु राहतात. आगामी काळात, भारतात अशा प्रकारची परिस्थिती अनुभवण्यात येणार आहे.
पर्जन्यमान:

१० एप्रिलपासून संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागांवर १० मे रोजी धुळीचे वादळ किंवा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
११ मे पासून, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगडचे काही भाग, किनारी आंध्रप्रदेश, अंतर्गत तमिळनाडु, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही भागांमध्ये पूर्व-मॉन्सून पावसाळी गतिविधींना प्रारंभ होईल.

पावसाळी गतिविधी १३ आणि १४ मे पासून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये पोहोचतील. त्यादरम्यान पूर्वोत्तर भारतभर पावसाचा लपंडाव चालू राहील. एकंदरीत पाहता, आपण असे म्हणू शकतो की गुजरातच्या अलिप्त भागांसह जवळजवळ संपूर्ण देशात पावसाळी गतिविधी सुरु होण्यास थोडासाच अवधी आहे.

या दरम्यान, नैऋत्य मैदानी प्रदेशात तीव्र धुळीचे वादळ आणि गडगडाटी पावसाळी गतिविधी अनुभवल्या जावू शकतात, याकाळात वाऱ्याची गती प्रतितास १०० किमीपर्यंत असू शकते. या कालखंडात पूर्व भारतात नॉरवेस्टर्स आणि तीव्र वीजा देखील कोसळू शकतात.
पूर्व-मॉन्सून पावसाळी गतिविधी देशाला उष्णेतेच्या तावडीतून बाहेर पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, ज्या नंतर संपूर्ण देशावर पकड घेतील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES